
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. कसई दोडामार्ग येथील निसर्ग फार्ममध्ये संपन्न होणार आहे. यावेळी सामाजिक, व्यावसायिक व प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा देखील गौरव करण्यात येणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार रत्नदीप गवस व प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, लवू परब व शंकर जाधव यांना उदयोन्मुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याखेरीज सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उपअभियंता अनिल बडे, उद्योजक सिद्धेश भोसले सामाजिक क्षेत्र व उद्योजक व गव्हर्नमेंट कॉन्टॅक्टर दत्ताराम उर्फ बाबा टोपले व्यवसायिक क्षेत्र यांचाही यांनाही यावेळी पत्रकार समिती पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे.
या सोहळ्यास उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रथितयश उद्योजक विवेकानंद नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार अमोल पोवार, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, मुख्याधिकारी संकेत गायकवाड तर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच दोडामार्ग तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार समितीच्या वतीने अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, खजिनदार रत्नदीप गवस, उपाध्यक्ष साबाजी सावंत व शंकर जाधव आदींनी केले आहे.