भूदान चळवळीतले कार्यकर्ते फक्रोजीराव देसाई याचं दोडामार्ग ITI ला नाव

Edited by: लवू परब
Published on: October 11, 2024 13:26 PM
views 147  views

दोडामार्ग : गोवा मुक्ती दिन आणि विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सक्रिय सहभग घेऊन स्वातंत्र्य सैनिक हा किताब प्राप्त कलेले दोडामार्ग कळणे गावाचे सुपुत्र कै. फक्रोजीराव भिवा देसाई यांचे नाव दोडामार्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सगळीकडे दसऱ्याची जय्यत  तयारी केली जात आहे आणि दोडामार्ग कळणे वासियांना मात्र शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कळणे गावचे माजी सरपंच फक्रोजिराव भिवा देसाई यांचे नाव देण्याचे गिफ्ट  दसऱ्या निमित्त दिले आहे. एखाद्या शासकीय संस्थेला स्वतंत्र सैनिक यांचे नाव दोडामार्ग तालुक्यात प्रथमच दिले जात आहे. कळणे गावाबरोबर दोडामार्ग तालुक्यातही आनंददायी उत्साह निर्माण झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील कळणे हे एक छोटे गाव पण या ठिकाणी सुरू झालेल्या कळणे मायंनिग आंदोलन मुळे ते संपूर्ण राज्यात माहीत झाले. या कळणे गावचे माजी सरपंच स्वातंञ्यसैनिक कै. फक्रोजीराव देसाई यांचे नाव आता फक्रोजीराव देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग असे देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. कै. फक्रोजीराव भिवा देसाई यांचा जन्म १२ डिसेंबर १९१४ मध्ये कळणे गावात झाला. शिक्षण सातवी पास त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीतून केली. गोवा मुक्ती लढ्यात भूमीगत राहुन मुक्ती लढ्यात कार्य करणाऱ्या  व्यक्तींना सहकार्य केले. 

विश्वनाथ लवंडे, प्रभाकर सिनारी, श्रीमती मार्गारेट अल्वा, या थोर स्वतंञ्य  सैनिकांवर काम केले कळणे गावचे सरपंच म्हणून सलग २८ वेळा कळणे गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले. सामाजिक कार्यात देखील सक्रिय होते. कळणे गावचे सरपंच झाल्यावर कै फक्रोजीराव भिवा देसाई यांनी गावात पोस्ट ऑफिस, माध्यमिक विद्यालय, कळणे मुक्तद्वार गंथालय, कळणे विद्यालयात प्रथम संस्था अध्यक्ष  म्हणून काम केले. कळणे  पंच क्रोशीत ते लोकप्रिय होते. त्यांच्या पुढे बोलण्याची हिम्मत नव्हती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देसाई यांनी सहभाग घेतला. 

सावंतवाडी संस्थानाचे राजे श्रीमंत कै. शिवरामराजे भोसले, आणि  कै. प्रताप राजे भोसले , माजी मंत्री कै. भाई सावंत यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे करून घेतली. अशा उत्तुंग प्रभावशाली व्यक्तीमत्व देसाई यांचे १९९३ साली निधन झाले. गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी पोर्तुगीज विरुद्ध भूमिगत लढा देत होते. त्यामुळेच गोवा राज्य निर्मितीनंतर गोवा शासनाने श्री पक्रोजीराव देसाई यांना स्वातंत्र्यसैनिक हा किताब सन्माननीय रित्या बहाल केला .

आज दोडामार्ग तालुक्यातील एका थोर स्वातंत्र्यसैनिक कै फक्रोजीराव भिवा देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नाव दिले जाते ही दोडामार्ग वासियांना दसरा भेट आहे. कळणे गावचे माजी सरपंच मनोहर देसाई यांचे ते वडील होते. तर विद्यमान सरपंच अजित देसाई यांचे ते आजोबा होते. लवकरच हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात  होणार आहे.