दोडामार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अजित चांदेलकर

सचिवपदी नितिन मणेरीकर
Edited by: संदीप देसाई
Published on: September 12, 2023 21:14 PM
views 149  views

दोडामार्ग: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्गची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून  अध्यक्षपदी अजित चांदेलकर तर सचिवपदी नितीन मणेरिकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रशांत नाईक व खजिनदार म्हणून उदय मयेकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.


       येथील पिंपळेश्वर हॉलमध्येया मंडळाची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्यात येत्या गणेशोत्सवाचे नियोजन तसेच नवीन कार्यकारिणीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष अजित चांदेलकर, उपाध्यक्ष प्रशांत नाईक- केरकर, सचिव नितीन मणेरिकर, खजिनदार उदय मयेकर, सहसचिव शामसुंदर चांदेलकर, सदस्य सुधीर चांदेलकर, विशांत परमेकर, आनंद कामत, सागर चांदेलकर, संदीप मिरकर, प्रमोद परमेकर, सल्लागार आनंद तांबुळकर, अनिल परमेकर, इतर सदस्य सुदेश मळीक, अंकुश मिरकर, प्रकाश सावंत, प्रवीण आरोंदेकर, विशाल मणेरीकर, विलास मिरकर, सुमंत मणेरिकर, संतोष नानचे, संतोष फाटक, शैलेश गोवेकर, प्रताप ऐनापुरकर, मधुकर कुबडे आदींचा या कार्यकारिणीत समावेश आहे.

      पिंपळेश्वर सभागृहात गेली कित्येक वर्ष स्थापना करण्यात येणारा सार्वजनिक गणेशोत्सव तसा फक्त दोडामार्ग शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून परिचित आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्गला एक खास परंपरा आहे. ही परंपरा नवीन कार्यकारणी मोठ्या उमेदीने पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे.