दोडामार्ग शहरवासीयांचा गढुळ पाणी प्रश्न सोवण्यासाठी नगराध्यक्षांसह टीम मैदानात

Edited by: संदीप देसाई
Published on: October 10, 2023 14:50 PM
views 179  views

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात गढूळ पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आता स्वतः नगराध्यक्ष व त्यांची टीम मैदानात उतरली फिल्टरशन प्लांट कार्यान्वीत होई पर्यंत काय उपाययोजना करता येईल याचा आढावा घेऊन प्रत्यक्ष काम सुरू केलं आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणं आमची जबाबदारीच आहे. मात्र वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून त्यावर उपययोजना करणे आवश्यक आहे. आणि त्या उपाययोजना नगरपंचायतने हाती घेतल्याचे नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. 

दोडामार्ग शहरातील सर्व भाग नळपाणी योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे टाकी साफ करण्यापासून ते सेफवॉल दुरुस्ती करण्याचे काम आता पाऊस कमी होताच युध्द पातळीवर हाती घेण्यात आल आहे. संबधित ठेकेदार यांनी काम करत असताना सेफझोन म्हणून माती भरून बॅग लावल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर ते काढणे भाग होते परंतु त्या बॅग तशाच ठेवल्यामुळे नदीपात्रातील येणारी माती त्या  ठिकाणी साचून राहत होती त्यामुळे येणाऱ्या पाण्यासोबत ती माती येत होती परिणामी नळयोजना विहिरीत गढूळ येत आहे.

आता त्यावर तात्काळ उपाययोजना केली जात आहे. काही दिवसांतच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये त्याच बरोबर संबंधित ठेकेदाराला ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याबाबतची कार्यवाही नगरपंचायत करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, नगरसेवक रामचंद्र मणेरिकर, माजी नगरसेवक संतोष म्हावळणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.