दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनीच्या एमकोल (बायोकोल) युनिटचा सासोलीत शानदार भूमिपूजन सोहळा

अवघ्या 100 दिवसात MCOAL युनिटमधून प्रॉडक्शन सुरू करणार | सिनिअर प्राईम बीडिए कार्तिक रावल यांनी दिला शब्द
Edited by: संदीप देसाई
Published on: December 03, 2022 10:05 AM
views 590  views

दोडामार्ग ; जेवढी परीक्षा मोठी तितकाच त्याचा रिझल्ट सुद्धा मोठा मिळतो, यासाठी धैर्य ठेवा. येत्या १०० दिवसात दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी एमकोल (बायोकोल) युनिटमधून प्रॉडक्शन सुरू करेल, नव्हे तर संपूर्ण देशात सुरू झालेल्या जैव इंधन क्रांतीत दोडामार्ग बायोप्युल्स कंपनीचे ऐतिहासिक काम असेल, असा विश्वास संबध भारत भर जैव इंधन निर्मितीसाठी काम करणार्याव मिरा क्लिनफ्युल्स् लिमिटेड कंपनीचे सिंनिअर प्राईम बिडिए कार्तिक रावल यांनी व्यक्त केला. संघर्षाचा काळ संपलाय, आता फळ चाखण्याचे दिवस आलेत, म्हणूनच आज झालेला भूमिपूजन सोहळा हा येथील कंपनीसाठी सुवर्णक्षण असल्याचे अभिमानाने जाहीर केले.

    मिरा क्लिनफ्युल्स् लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि दोडामार्ग क्लिनफ्युल्स् प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी व दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. कंपनीच्या एमकोल (बायोकोल) युनिटच्या भुमिपुजन सोहळा मोठ्या दिमाखात शुक्रवारी २ डिसेंबर ला सपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून एमसील कंपनीचे सिंनिअर प्राईम बीडिए कार्तिक रावल बोलत होते.  यावेळी त्यांचेसमवेत व्यासपीठावर एमसील कंपनीचे सीनियर प्राईम बीडिए कार्तिक रावल व कंपनीचे सीनियर प्राईम बिडिए श्रीकांत कर्जावकर, सीनियर बिडिए सागर सांगेलकर, मालवणचे एमपीओ वैभव पवार, कणकवलीचे दिगंबर रासम, देवगडचे राजेंद्र खडगे, बेळगावचे व सोंदतीचे एंपीओ, वेंगुर्लेचे संचालक उगवेकर, कुडाळचे प्रशांत शेलार, जमिनी मालक रामा सटजी, पोलिस पाटील संजय गवस, दोडामार्ग बायोफ्यूल्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर आदि उपस्थित होते.

गेली दोन वर्षे दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनीन जी मेहनत घेत गावोगावी ग्राम उद्योजक व गाव प्रतिनिधी यांचीही मोट बांधली, त्यांच्याच उपस्थित हा सासोली, भटवाडी येथे एमकोल (बायोकोल) युनिटसाठी घेतलेल्या जागेत युनिटचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा सपन्न झाला. यावेळी कंपनीचे सीनियर प्राईम  बीडिए श्रीकांत कर्जावकर, सीनियर बीडिए सागर सांगेलकर यांनीही दोडामार्ग टिमच्या कामांबाबत गौरद्गार काढले. यावेळी सांगलेकर यांनी या कंपनीशी जोडले गेलेल्या ग्राम उद्योजक व गाव प्रतिनिधी यांना मोटीवेट करताना संगितले, दोडामार्गची टिम 'सबसे बेस्ट' असून आता किंतु परंतु सोडा फक्त तुमची साथ आणि विश्वास एवढच आमच्यावर ठेवा अस आवाहन केल.

 

हरीहर मयेकर ग्रेट पर्सन

दुबई सारख्या गल्फ कन्ट्रीत अलिशान नोकरी आणि तितकीच मोठी पोझिशन असतानाही आपल्या देशात आपल्या मातीत आणि आपल्या माणसासाठी काही तरी करायचंय, यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हरीहर मयेकर यांचा जिद्दी व मेहनती प्रवास खरोखरच ग्रेट आहे. आज चांगली पोझिशन असतानाही आपल्याला रोजगारसाठी, नोकरीसाठी दुसऱ्या देशात जाऊन काम करावं लागताय ती वेळ आपल्या भावी पिढीवर येता कामा नये व भारत मातेचा सुपुत्र म्हणून गर्वाने आपल्या छातीवर आपल्या देशाचा तिरंगा लाऊन अभिमान बाळगावा, अस ध्येय ज्याचं आहे, अस अढळ नेतृत्व तुम्हाला लाभलय.  यासाठी साथ द्या, विश्वास ठेवा, येणारे उज्ज्वल पर्व तुमचच आहे असं आवाहन यावेळी कार्तिक रावल, सागर सांगेलकर यांनी आवर्जून केल.


या सोहळ्यातील ही काही क्षणचित्रे..