अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके

ग्रामस्थांचं उपोषण मागे
Edited by: लवू परब
Published on: April 23, 2026 19:01 PM
views 35  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरु असलेल्या अवैध खनीज व वाहतूक रोखण्यासाठी वरिष्ठ पाठळीवरून कारवाई करण्याचे आदेश आल्याने तालुक्यात ठीकठिकाणी भरारी पथके नेमण्यात आल्याचे लेखी पत्र दोडामार्ग तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर सुरु असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. 

दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल, तळकट, मोरगाव, कळणे, आडाळी एमआयडीसी व अन्य भागात मोठ्या प्रमाणात अवैध खनीज उत्खनन व वाहतूक केली जातं होती. ही वाहतूक व उत्खनन बंद करण्याबाबत  महसूल विभागाकडून डोळे झाक केली जातं होती. याच अनुषंगाने दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी उपोषण सुरु करण्यात आले होते. कुंब्रल सरपंच जनार्दन गोरे, मिलिंद नाईक, गणेश धुरी, विलास सावळ, आदी ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत खनीज उत्खनन  करण्यात येणाऱ्या गावात महसूलची भरारी पथके नेमण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस ही पथके तपासणीसाठी आदी भागात फीरणार असल्याचे दोडामार्ग महसूलकडून सांगण्यात आले. त्यामुळे खनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.