अखेर 'त्या' रुग्णवाहिकेवर चालकाची नेमणूक

बाबुराव धुरींनी दिला होता आंदोलनाचा इशारा
Edited by:
Published on: April 20, 2026 12:47 PM
views 66  views

दोडामार्ग : ठाकरे सेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेवर चालकाची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी धुरी यांनी संबंधित कंपनीचे आभार मानले.

गेले कित्तेक दिवस साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने रुग्णाचे मोठे हाल होत होते. याच  अनुषंगाने उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी संबंधित तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन या कंत्राटी कंपनीला निवेदन दिले होते. सोमवार पर्यंत चालकाची नेमणूक केली नसल्यास तालुका आरोग्य केंद्रावर ठिय्या आंदोलन  करू असा ईशारा दिला होता. संबंधित कंत्राटी कंपनीने याची दाखल घेत तात्काळ  चालकाची नेमणूक केली.