
दोडामार्ग : श्री काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली (ता. दोडामार्ग) यांच्या वतीने आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवारी २५ एप्रिल २०२६ रोजी साटेली येथे उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांचे ४९ वे मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ (कोल्हापूर) येथील पूज्य स्वामीजींची मंगलमय उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्संग सोहळा, प्रवचन, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ५.३० वाजता काकड आरतीने होणार असून सकाळी ९ वाजता सामुदायिक भजन, सायंकाळी ५.३० वाजता स्वामी महाराजांचे आगमन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण, सायंकाळी ७ वाजता दर्शन व प्रवचन आणि रात्री ८.३० वाजता आरती व सर्वांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
हा कार्यक्रम ओम गणेश मंडळ, ग्रामपंचायत पटांगण साटेली, वरचा बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सर्व गुरुभक्त व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व ओम गणेश मंडळ, साटेली यांच्या सहकार्याने समस्त काडसिद्देश्वर सांप्रदाय भक्तगण दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले असून एकनाथ गवस, राकेश धर्णे, सत्यवान धर्णे, अमित गवस, नारायण मयेकर व बुधाजी ( बाळू ) धर्णे आदींनी समस्त काडसिद्देश्वर सांप्रदाय भक्तगण मंडळाला सहकार्याच आवाहन केलं आहे.










