घोटगेवाडीत हनुमान जयंती उत्सवाचं आयोजन

Edited by: संदीप देसाई
Published on: March 31, 2026 15:34 PM
views 93  views

दोडामार्ग : घोटगेवाडी  येथील श्री हनुमान मंदिरात १ व २ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.

गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ७.०० वाजता श्री मारुती जन्मसोहळा व अभिषेक पार पडणार आहे. तसेच रात्री ९.३० वाजता श्री दत्तप्रसादिक नाट्य मंडळ, घोटगेवाडी यांच्या तर्फे तीन अंकी नाट्यकृती ‘रामशास्त्री’ सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखन पद्मश्री रणजित देसाई यांनी केले आहे.

या उत्सवाचे आयोजन श्री हनुमान वार्षिक जन्मोत्सव समिती, घोटगेवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून श्री हनुमान युवक व भजनी मंडळ मारुती गल्ली यांचे सहकार्य लाभत आहे. तरी सर्व भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.