
दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समिती सभापती पदी भाजपच्या पार्वती महादेव गवस तर उपसभापती पदी शिंदे शिवसेनेचे गणेश प्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी भाजपा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरूवात झाली. दुपारी १२:२० वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा पं.स. सदस्य गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पं. स. सदस्या स्नेहा गवस, कोनाळ पं.स. सदस्य सायली निंबाळकर, रामदास मेस्त्री दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपतालुकाप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, साटेली-भेडशी पं.स. सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पं.स. सदस्या सोनिया कुबल, माटणे पं.स. सदस्या पार्वती गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर व पदाधिकारी दाखल झाले.
सभापती पदासाठी भाजपाच्या पार्वती महादेव गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर उपसभापती पदासाठी शिंदे शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तुम्ही पदासाठी प्रत्येकी एक -एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून पुष्प गुच्छ देऊन जल्लोष केला.










