सुतारवाडीतील अपूर्ण रस्ता लवकर पूर्ण करणार

ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबतही सकारात्मकता | नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 09, 2026 18:39 PM
views 13  views

कणकवली : कणकवली शहरातील सुतारवाडी परिसरातील अपूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल तसेच या परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीबाबतही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले.तसेच श्री.पारकर यांनी सुतारवाडी येथील अपूर्ण रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या कामासह परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी मांडली. यावर पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, तेजस राणे, परेश बागवे, सहदेव बागवे, बाळा बेळेकर, अक्षय मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, नगरपंचायत कर्मचारी तसेच महावितरणचे अधिकारी सह. अभियंता ओंकार स्वामी उपस्थित होते. सुतारवाडी परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत ओंकार स्वामी यांच्याशी नगराध्यक्ष पारकर यांनी सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.