
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या विषय समित्यांच्या एका सभापतीपदी भाजपच्या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली तर उर्वरीत दोन सभापती पदे रिक्त राहिली. यामध्ये आरोग्य व शिक्षण सभापतीपदी संजना संतोष म्हावळंकर यांची निवड झाली. तर बांधकाम सभापतीपद, महिला व बालकल्याण सभापती ही पदे नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने रिक्त राहिल्याची माहिती मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी दिली. या नगरपंचायत मध्ये एकूण १७ नगरसेवकांपैकी पैकी दोन शिवसेनेचे (उबाठा) तर उर्वरित १५ नगरसेवक हे भाजपचे आहेत. ही निवड प्रक्रिया येथील नगरपंचायतमध्ये घेण्यात आली होती.










