शिरंगे पुनर्वसन देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव ३१ डिसेंबरला

Edited by: लवू परब
Published on: December 30, 2025 19:56 PM
views 13  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे पुनर्वसन येथे नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे. साटेली-भेडशी येथून जवळ असलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांतर्गत गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावात हा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने परिसरासह दूरवरून भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात.

जत्रोत्सवाच्या निमित्ताने ओटी भरणे, देवीची महाआरती तसेच मामा मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.