दोडामार्गात ठाकरे सेनेकडून जि. प. - पंचायत समितीसाठी इच्छुकांची चाचपणी

Edited by: लवू परब
Published on: November 15, 2025 16:57 PM
views 134  views

दोडामार्ग : दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली सुरु केली असून. तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती साठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.. ही निवडणूक ताकदीने लढण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत. पंचायत समिती वर भगवा फडकविणार असा आशावाद व्यक्त केला आहे.

उबाठा पक्षाची महत्व पूर्ण बैठक दोडामार्ग येथे पार पडली या महत्वपूर्ण बैठकीला जिल्हा प्रमुख यांनी मार्गदर्शन करीत शिवसैनिक या निवडणुकीत कसे सामोरे जातील. सत्ताधारी बाबत रोष आहे. तो या निवडणुकीत दिसून येईल.. यासाठी शिवसैनिकांनी आता पासूनच कामाला लागले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तालुका प्रमुख संजय गवस यांनी संपूर्ण तालुक्यात आरक्षणाची परिपूर्ण माहिती देत आपण सर्वजण कोणत्या मतदारसंघात कशाप्रकारे निवडणूक लढवू शकतो यासाठी शिवसैनिकांनी कसे नियोजन करावे यांची परिपूर्ण माहिती देत जि.प व पंचायत समितीवर  जिंकण्यासाठी आपण सज्ज आहोत..असे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, उपजिल्हा संघटक महिला आघाडी विनिता घाडी, लक्ष्मण आयनोडकर ,विजय जाधव, मदन राणे, मिलिंद नाईक, सरपंच जनार्दन गोरे, झरेबांबर उपसरपंच श्याम नाईक, मोर्ले उपसरपंच विभाग प्रमुख संतोष मोर्ये, दशरथ मोरजकर , संदेश राणे ,भिवा गवस, सूचन कोरगावकर ,महादेव कुबल, सिध्देश कासार,ओलवीन लोबो, जेनिफर लोबो, प्रकाश नाईक, संजय सुतार, गणेश धुरी, प्रदिप सावंत. विष्णू मुंज, सोमनाथ गवस, रेश्मा शेख, दिलीप शेर्लेकर, महादेव नाईक, मंगेश गवस, शुभंकर देसाई सत्यवान नाईक आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.