
दोडामार्ग : वायंगनतड येथील काही युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला. गावातील प्राथमिक शाळेसमोर असलेल्या राज्यमार्गावरील खोल चर त्यांनी स्वतः चिरे व करपे टाकून बुजवला आहे. या मुख्य रस्त्यावरील चरामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना तसेच वाहनचालकांना वाहने हाकताना मोठा धोका निर्माण झाला होता.
मात्र, लवू नाईक व त्याचे सहकारी मित्रांनी स्वतः पुढाकार घेत हे समाजोपयोगी काम पूर्ण केले. त्यांच्या या कार्यामुळे संभाव्य अपघात टळले असून वाहतूकही काही काळासाठी सुरक्षित झाल्याने स्थानिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. लवू नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या या सामाजिक कार्याचे नागरिक, शिक्षकवर्ग तसेच वाहनचालकांकडून कौतुक होत आहे.










