
दोडामार्ग : ग्रामपंचायत तेरवण मेढे अंतर्गत "घर तेथे शोषखड्डा" या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सोनावल येथे मनोज गावडे यांच्या घराजवळ नुकताच करण्यात आला. या प्रसंगी दोडामार्ग पंचायत समितीच्या स्वच्छता विभागातील तज्ञ सुभाष नाईक व अर्जुन गवस यांनी शोषखड्ड्याची आखणी करून त्याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात मनोज गावडे यांनी प्रत्यक्ष शोषखड्डा खोदून अभियानास सुरुवात केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अमित दळवी यांनी शोषखड्ड्याची कार्यपद्धती व त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला गावडे कुटुंबिय तसेच प्रमोद गवस, ग्रामपंचायत सदस्य सौ. चंद्रकला केसरकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमातून गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन ‘घर तेथे शोषखड्डा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.










