
दोडामार्ग : बेकायदा मांस वाहतूक व कार जाळपोळ प्रकरणी दोडामार्ग नगरध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस व इतरांना दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार ३० सप्टेंबरपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार जाळपोळ केल्याच्या आरोपवरून कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, वैभव रेडकर, विजय कदम यांना चौकशीसाठी दोडामार्ग पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले होते. यानंतर जाळपोळप्रकरणी या सर्वांवर गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत ठेवले. शुक्रवारी त्यांना दोडामार्ग न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.










