
दोडामार्ग : बेकायदा गोमांस वाहतूक व कार जाळपोळ प्रकरणी दुसऱ्या दिवशीही दोडामार्गात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तालुक्याची मुख्यालय इमारत तहसील इमारतीच्या बाहेर बॅरिगेट्स लावून सर्वसामान्य नागरिकांना याठिकाणी पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. त्यामुळे पोलिसांच्या या कृत्यामुळे सर्व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दोडामार्ग तहसील इमारतीत कृषी विभाग, दुय्यम निबंधक, सेतू सुविधा, आधार कार्ड सेंटर आदी कार्यालयात नागरिकांना आपले काम करण्यासाठी जाताना ही पोलिसांकडून अडवडूक करण्यात येत होती. त्यामुळे मुख्यालय ठिकाणी आपल्या कामासाठी आलेल्या काही नागरिकांना काम न करता माघारी परतावे लागले.










