
दोडामार्ग : तिलारी दोडामार्गमध्ये कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस यांसह ४ जणांना ताब्यात घेतल्याने वातावरण तंग झाले आहे. भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग दोडामार्गमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात पालकमंत्री नितेश राणेही दोडामार्ग मध्ये दाखल होत असल्याची माहिती पुढे येतेय. दरम्यान, पोलिसांच्या कारवाई बाबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. पोलीस चोर सोडून सन्याशाला फाशी देत असल्याच्या भावना व्यक्त होतं आहे. अद्यापही पोलीस अधीक्षक मोहन दहिकर दोडामार्ग मध्ये ठाण मांडून असल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या नगराध्यक्ष व तालुकाध्यक्ष व अन्य दोघे यांच्याबाबत काय निर्णय घेतात. चौकशीत काय पुढे येतंय. आणि त्यांनंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दोडामार्गमध्ये घडलेल्या यां गंभीर घटनेनंतर पोलीस यंत्रणा तितकीच सतर्क झाली आहे. कधी नव्हे तितका पोलीस फाटा दोडामार्गमध्ये तैनात करण्यात आला आहे. तब्बल १५ हुन अधिक पोलीस कर्मचारी यांना घेऊन गाड्या दोडामार्ग मध्ये दाखल झाल्याने तहसीलदार आवार व मुख्य बाजारपेठला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. शेकडोहुन अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी तहसीलदार कार्यालय गेटवर व आवारात तैनात असून आतमध्ये ताब्यात घेतलेल्या ४ ही जणांची कसून चौकशी सुरु आहे. अद्यापही पोलिसांकडून यां घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, पोलीस व त्याहून अधिक प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक तहसीलदार कार्यालय आवराबाहेर जमा झालेले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर दोडामार्ग तहसीलदार आवारात उबाठा शिवसेना उपाजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनीही हजेरी लावत घटनेचा आढावा घेतला. पोलीस कारवाई स्पष्ट झाल्यावरचं आपण भाष्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.










