
दोडामार्ग : केवळ स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमदार दीपक केसरकर व बाबुराव धुरी यांच्यावर एकनाथ नाडकर्णी नाहक आरोप - प्रत्यारोप करत आहेत. वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेण्याचा त्यांचा तो केविलवाणा प्रयत्न आहे.
मात्र, नाडकर्णी यांचा कुठल्याही सामाजिक किंवा राजकीय घटकाशी सोयरसुतक नसून, स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ तिकीट मिळवण्यासाठी अशा हालचाली सुरू असल्याची टीका शिंदे सेनेचे युवा तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे. युवा सेनेच्या या वक्तव्यामुळे स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकीय वातावरणात चांगलाच खळबळ माजवणारा माहोल निर्माण झाला आहे.










