बाबुराव धुरी हे नावाचेच शेतकरी : एकनाथ नाडकर्णी

Edited by: लवू परब
Published on: September 23, 2025 17:15 PM
views 267  views

दोडामार्ग : उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी हे आपण शेतकरी आहे अशी वल्गना नेहमी करत असतात. पण त्यांना शेतकऱ्यांचे काहीही सोयर सुतक नाही आहे. तेही याआधी खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबतच तालुक्यात काम करत होते. त्यावेळीही अशाच प्रकारे हत्ती प्रश्न गंभीर होता. त्यावेळी त्यांना कधी हत्ती प्रश्नांवर बोलावे, काहीतरी करावे असे वाटले नाही. फक्त पक्षाकडून कार्यक्रम आला आहे म्हणून बेताल वक्तवे करत फिरत असतात.

एकतर त्यांच्यासोबत आता कार्यकर्ते ही दिसत नाहीत आणि स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वाट्टेल ते बोलत फिरत असतात. त्यामुळे त्यांनीही यापुढे पालकमंत्री नितेश राणे यांचे काम पहावे आणि नंतरच बोलावे असेही नाडकर्णी यांनी धुरी यांना सुनावले आहे. तसेच धुरी यांनी आपल्या भिकेकोनाळ या गावी गायी पाळल्या आहेत. हे अतिशय उत्कृष्ट काम केले. पण त्यांना चरण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये सोडून घालत असल्यामुळे काहींचे नुकसान होत आहे. त्यामुळे धुरी यांनी हत्तींवर लक्ष न देता आपल्या गायींवर लक्ष द्यावे अशी उपहासात्मक टीकाही नाडकर्णी यांनी केली आहे.