
दोडामार्ग : नवरात्रोत्सवात श्री देवी सातेरी पंचायतन नवरात्रोत्सव मंडळ मणेरी येथे ९ दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. सोमावार दि. २२ सप्टेंबर रोजी देवींची पूजा, व रात्री 8.00 वाजता खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. २३ रोजी सकाळ पासून विविध कार्यक्रम व रात्री 8. 30 वाजता डबल बारीचा कार्यक्रम होणार आहे.
२४ रोजी ओम कला दांडिया हळर्णा गोवा यांचा दाडिया कार्यक्रम, 25 रोजी भजन, तसेच समयी नृत्य, 26 रोजी आरती, स्थानिक भजने, अमृत मोहिनी नाटक, तसेच दाडिया होणार आहे. २७ रोजी भजन व उगवे गोवा येथील दांडिया तसेच २८ रोजी भजन, चपय नृत्य व म्हपसा गोवा येथील दाडिया, २९ रोजी स्थानिक भजने, स्वर ताल संगीत विद्यालयचे भजन ३० रोजी दांडेली येथील जय हनुमान पारंपारीक दशावतार नाटक होणार आहे. तसेच ०१ ऑक्टोबर रोजी संस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.










