
दोडामार्ग : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी उशिरा रात्री दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशनला अचानक भेट देत प्रशासनाला सज्जड दम दिला. ग्रामीण रुग्णालयातील पाहणीत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच सुनावले. रुग्णालयाचा कारभार, औषधसाठा व सेवा यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ॲडमिट रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून सुविधा पुरेशा आहेत का, याची चौकशीही केली.
अनुपस्थित डॉक्टर डॉ. मसुरकर यांना त्यांनी तत्काळ फोन करून गैरहजेरीबाबत खरडपट्टी काढली. “रुग्णालयातील कामकाजात बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही, रुग्णांना उत्तम सेवा मिळालीच पाहिजे,” असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट दोडामार्ग पोलीस स्टेशनला हजेरी लावली. त्यांच्या या अचानक भेटीने पोलीस दलात एकच हलकल्लोळ उडाला. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत चर्चा करून “अवैध धंद्यांना कुठेही थारा मिळता कामा नये, गाठ माझ्याशी आहे, कारभार सुधारा,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.
या रात्रीच्या धडक तपासणीमुळे दोडामार्गातील आरोग्य आणि पोलीस प्रशासन दोघांनाही सतर्कतेचा धडा मिळाला. गुरुवारी दोडामार्ग दोऱ्यावर असताना पूर्वकल्पना न देता अचानक रात्री दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशनला अचानक भेट देत प्रशासनाला सज्जड दम दिला.
ग्रामीण रुग्णालयातील पाहणीत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच सुनावले. रुग्णालयाचा कारभार, औषधसाठा व सेवा यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ॲडमिट रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून सुविधा पुरेशा आहेत का, याचीही त्यांनी चौकशीही केली. अनुपस्थित डॉक्टर डॉ. मसुरकर यांना त्यांनी तत्काळ फोन करून गैरहजेरीबाबत खास आपल्या शैलीत हजेरी घेतली. यावेळी “रुग्णालयातील कामकाजात बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही, रुग्णांना उत्तम सेवा मिळालीच पाहिजे,” असा स्पष्ट इशारा राणे यांनी आरोग्य विभागाला यावेळी दिला.
त्यानंतर पालकमंत्री यांनी थेट दोडामार्ग पोलीस स्टेशनला हजेरी लावली. त्यांच्या या अचानक भेटीने पोलीस दलात एकच तारांबळ उडाली. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत चर्चा करून “अवैध धंद्यांना कुठेही थारा मिळता कामा नये, कारभार सुधारा,” माझं याकडे विशेष laksh राहणार आहे, असा कठोर इशारा त्यांनी दिला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या या अचानक झालेल्या रात्रीच्या धडक व्हिजिटमुळे दोडामार्गातील आरोग्य आणि पोलीस प्रशासन दोघांनाही सतर्कतेचा धडा मिळाला, एवढं मात्र नक्की.










