
दोडामार्ग : केर - भेकुर्ली ग्रामपंचायतने महत्वाचा उपक्रम घेतला असून कमी जळावामध्ये पाणी गरम करण्यासाठी संस्था सहकार्याने जवळपास १४० जणांना ७५ टक्के अनुदानावर पाणी गरम करण्याचे बंब रविवारी वितरित केले. महत्वाचे म्हणजेच या उपक्रमामुळे जळावू लाकडू शोधणे यासाठी माता भगिनींना होणारा त्रास कमी होणार आहे.
वाटप कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत केर - भेकुर्ली सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, सदस्य मेघना देसाई, लक्ष्मी धुरी, गायत्री देसाई, निलेश देसाई, यांसह डब्लू. सी. टी. प्रतिनिधी आणि अभ्यासक गिरीश पंजाबी, अमित सुतार, राहुल ठाकूर, आणि सूरज शेंडे, त्या त्या वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ, महिला, युवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
डब्लू. सी. टी. च्या सहकार्याने, ग्रामपंचायतच्या सहयोगातुन, आपल्या गावांत पाणी तापविण्याचे बंब देण्याचे ठरले होते. एकूण १४० पैकी भेकुर्ली येथील १८ वगळता सर्व वाटप पूर्ण झाले. भेकुर्लीचे, १८ बंब केर येथे आहेत ते भेकुर्ली येथे नेणे वाटप करणे याबाबत नियोजन झाले आहे. अतिशय शांतपणे केर, गावठणवाडी, अवाटवाडी, निडलवाडी ग्रामस्थ, युवक, माता भगिनी यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतच्यावतीने आभार मानण्यात आले.
एका बंबवर ग्रामस्थांचे साधारण ५८५० हजार रु बचत झाले म्हणजेच १४० बंबचे मिळून ८ लाख रुपयांपेक्षा अधिक बचत झालेत नकळत ही सेवा करण्याचे भाग्य ग्रामपंचायत कार्यकारणीला मिळाली असून यासाठी पुढाकार घेणारे डब्लू. सी. टी. यांचे ग्रामपंचायतच्यावतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. हा प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेला एक प्रमुख डब्लू. सी. टी प्रकल्प आहे,जे डब्लू. सी. टी चे रेझिलिएंट फ्युचर टीमने सुरुवात केली. आता, डब्लू. सी. टी ने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये हा पुरस्कार विजेता उपक्रम हाती घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील या पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाला ब्रिटिश एशियन इंडियन फाउंडेशन (BAIF) आणि कृष्णाग्नी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे आर्थिक पाठबळ मिळाल्याची माहिती अभ्यासक गिरीश पंजाबी यांनी यावेळी दिली.