योगदिनी डॉक्टरांनीच घेतले योगाचे धडे

गोव्यातील आरोग्य भारतीकडून डॉक्टर वर्गासाठी खास सपन्न झालं योग शिबीर
Edited by: संदीप देसाई
Published on: June 21, 2025 22:55 PM
views 135  views

दोडामार्ग : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा डॉक्टर वर्गासाठी दोडामार्ग तालुक्यात आरोग्य भारती गोवा यांच्याकडून जागतिक आरोग्य दिनाचे ओचित्य साधून योग शिबिर नुकतेच सपन्न झाले. येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात आरोग्य भारती गोव्याचे डॉ. आदित्य बर्वे यांनी तालुक्यातील उपस्थित डॉक्टर्सकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली.

   हे शिबिर सकाळी ८ ते ११ वाजता या वेळेत संपन्न झाले. डॉ. बर्वे यांनी योगासनांची परिपूर्ण माहिती देत डॉक्टर वर्गाला प्रत्यक्षिकेही करून दाखवली. या शिबिरात तालुक्यातील डॉ. उमेश देसाई, डॉ. महेश पवार, डॉ. अमोल देसाई, डॉ. समीर गवस, डॉ. नंदकिशोर दळवी, डॉ. रामदास रेडकर, डॉ. कृष्णा कविटकर, डॉ. योजना मोरजकर, डॉ. मनाली पवार, डॉ. संदेश नांदोडकर, डॉ. दर्शना घोगळे, डॉ. केतकी गवस, डॉ. प्रियांका बर्वे, डॉ. श्वेता देसाई, डॉ. गौरी देसाई, डॉ. वंदना गुजांटे यांसह संजय सावंत, संजय नाटेकर यांनीही सहभाग घेतला होता.