श्वास नलिकेत अडकलेले सिम कार्डचं पिन काढण्यात वालावलकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

Edited by: मनोज पवार
Published on: August 24, 2024 05:54 AM
views 1698  views

चिपळूण : डेरवण-सावर्डेच्या वालावलकर रुग्णालयात महिलेच्या श्वास नलिकेत अडकलेले मोबाईल सिम कार्ड चे पीन, टाका रहित ऑपरेशन म्हणजेच ब्रोन्कोस्कोपी करून तज्ञांनी बाहेर काढले. 

रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने  दिनांक २०. ०८. २०२४ रोजी रात्री, आपल्या मोबाईलचे सिम बदलतांना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवलेली,  तेव्हा चूकून त्या महिलेने ती सिम कार्डची पिन गिळली. त्यावेळेस तिला श्वासोश्वासाला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविद्रं गोंधळेकर यांना दाखवले तेव्हा त्यानी अन्ननलिकेची स्कोपी केली पण त्यांना ती पिन दिसली नाही नंतर त्यांनी छातीचा एक्स- रे  व  (CT Scan) सिटी  स्कॅन केला त्यामध्ये त्यांना ती उजव्या बाजूच्या श्वास नलिकेत दिसली. डॉ. गोंधळेकर यांनी लगेच पेशंटला वालावलकर हॉस्पिटला  जाण्यास सांगितले.


वालावलकर हॉस्पिटलमधे येताच पेशंटला वालावलकर रुग्णालयाचे ई. एन. टी  सर्जन डॉ. राजीव केणी यांनी  तातडीक सेवा विभागात तपासले व नातेवाइकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून सिम कार्डचे पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला. नातेवाईकानी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पीटलच्या कान ,नाक ,घसा तज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची  तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पूर्वतपासण्या व ऑपरेशनची तयारी लगेच करून घेतली. रात्री सुमारे १० वाजता पेशंटला ऑपरेशनला घेण्यात आले व डॉ.राजीव केणी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफुसाच्या श्वासनलिकेतील सिम कार्डचे पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्या.