रक्ताळलेले पैसे नको म्हणणारे केसरकर गोमुत्र शिंपडून वाटप करातायत का ? : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 14:34 PM
views 30  views

सावंतवाडी : इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथील गांधी चौकात जाहीर सभेच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बबन साळगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सावंतवाडी शहरात विश्वप्रवक्ते रस्त्यावरून फिरताना दिसले. अनेक वर्षे या भागाच प्रतिनिधित्व करत असतानाही प्रचारासाठी फिरावं लागलं. केवळ आश्वासन देण्याच काम दीपक केसरकर यांनी केलं. ज्यांनी राणेंना शिव्या घातल्या, दहशतवाद सांगितला तेच आज त्यांना कोकणचा वाघ म्हणत आहेत. राणेंच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं सांगून केसरकरांनी पक्ष सोडला. शरद पवारांची साथ सोडली. दुसऱ्या पक्षात जाण्यासाठीच त्यांनी हे कारण शोधले होते. आज तेच केसरकर सावंतवाडीच्या रस्त्यावर राणेंच्या मतांसाठी फिरताना दिसले असा हल्लाबोल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. 

तुम्ही विकास केला असता तर मतांसाठी पैसे का वाटावे लागतात ? रक्ताळलेले पैसे नको म्हणणारे केसरकर आज गोमुत्र शिंपडून पैसे वाटत आहेत का ? मतांसाठी एक हजार रूपये वाटले जात आहेत असा आरोप माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला. दीपक केसरकर म्हणजे विश्वासघात असं बोललं जातं आहे. मुलीच्या हॉस्टेलवर खरच गुंड पाठवले होते की राजकारणासाठी कुभांड रचलं ? याच उत्तर द्या असं आव्हान केसरकरांना दिलं. केसरकर यांनी राजकारणाचा व्यवसाय केला आहे. पन्नास खोके घेतले नाहीत तर कोणत्या पैशातून रखडलेल्या वैयक्तिक प्रोजेक्टच काम करत आहेत हे सांगाव असं आव्हान दिल. तर हा थंड दहशतवाद संपविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विजयी करा असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल. याप्रसंगी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला नेत्या कमलताई परूळेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, बाळा गावडे, मायकल डिसोझा  आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.