वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी बिनविरोध

व्हाईस चेअरमनपदी प्रज्ञा परब
Edited by: दिपेश परब
Published on: January 12, 2023 17:18 PM
views 300  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी मातोंड येथील ज्ञानेश्वर केळजी व व्हाईस चेअरमनपदी महिला काथ्याच्या प्रज्ञा परब यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

सहकारी संस्था सहाय्यक निबंधक उमिंला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक चित्रा कनयाळकर, विष्णु फणसेकर, दत्तात्रय वजराठकर, गुरुनाथ मडवळ, प्रकाश गडेकर, यशवंत परब, विजय रेडकर, महादेव गावडे, सुजाता देसाई, गणेश गोसावी, जनार्दन कुडाळकर, महेश परुळेकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, समीर कुडाळकर, कमलेश गावडे आदी उपस्थित होते. निवड जाहीर होताच संघाच्या सर्व संचालक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.