
दोडामार्ग : परमे पणतुर्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भाजप पुरस्कृत दिया दीपक गवस यांची निवड झाली आहे. शुक्रवारी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिया गवस व सुनील गवस या प्रतिस्पर्धी उमेदवारात लढत झाली. मात्र सरपंच प्रथमेश मणेरीकर यांचं निर्णायक मत दिया गवस यांच्या बाजूने पडल्याने दिया गवस यांची उपसरपंच पदी वर्णी लागली.
परमे पणतूर्ली ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी भाजप पुरस्कृत प्रथमेश मणेरीकर हे विजयी झाले होते. त्यांनी सुरुवातीलाच आपण भाजप पुरस्कृत सरपंच असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे विरोधी विरोधी गटाकडून उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सुनील भिकाजी गवस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. मात्र या निवडणुकीत समसमान मत झाल्याने सरपंच यांच निर्णायक मत महत्त्वपूर्ण ठरलं. त्यामुळे सरपंच गटाच्या दिया दीपक गवस या विजयी झाल्या. भाजप पुरस्कृत गवस यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संजय विरनोडकर यांनी परमे पणतुर्ली येथे भेट देत सरपंच प्रथमेश मणेरीकर व उपसरपंच दिया गवस यांचं अभिनंदन केलं.