
देवगड : देवगड तालुक्यातील शेठ म.ग. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दीक्षित फाउंडेशन मार्फत देवगड मधील विद्यार्थ्यांसाठी या फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन निळकंठ दीक्षित यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्षेत्रात आपला ठसा उमठविणाऱ्या दीक्षित फाउंडेशन मार्फत शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मधील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन या फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन निळकंठ दीक्षित यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.
दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत आणि ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्यामार्फत गुरुवार दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर या दोन दिवशी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी वर्गासाठी सतत कार्य करणाऱ्या या दीक्षित फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरामुळे डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत दक्ष राहून या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी हायस्कूल मधील प्राथमिक विभागातील, माध्यमिक विभागातील आणि उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.
दीक्षित फाउंडेशन मार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या शिबिराबाबत शाळेच्या संस्थेने आणि शाळेने तसेच पालक वर्गाने या दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले ले आहे. या शिबिराचे उद्घाटन गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्यामार्फत होणार आहे. यावेळी ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब आणि त्यांचे सहकारी व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. शाळेचे स्थानीय संस्था पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.










