पेंडूर - सातवायंगणी येथे २२, २३ रोजी दीपावली शो टाईम

Edited by: ब्युरो
Published on: November 14, 2023 16:59 PM
views 142  views

वेंगुर्ले : पेंडुर-सातवायंगणी येथील ओंकार कला-क्रीडा मंडळातर्फे २२ व २३ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम अंतर्गत खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खेळ पैठणीचा पाककला स्पर्धा व अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रात्री ८.३० वाजता सातवायंगणी मर्यादीत महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७०१ रुपये तर तृतीय ५०१ रुपयांचे पारितोषिक आहे. रात्री १० वाजता सातवायंगणी मर्यादीत 'खेळ पैठणीचा' कार्यक्रम होणार आहे. विजेत्यास पैठणी व उपविजेतीस साडी भेट देण्यात येणार आहे.

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सातवायंगणी मर्यादीत रांगोळी स्पर्धा होणार आहे. प्रथम विजेत्यास ३५० रु., द्वितीय ३०० रु. व तृतीय विजेत्यास २५० रु.चे पारितोषिक देण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता स्लो सायकल 'स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास २५० रुपये, द्वितीय २०० रु.चे पारितोषिक आहे. दुपारी तीन वाजता स्लो मोटारसायकल स्पर्धा होणार आहे. विजेत्यास उपविजेत्यास ५०० ३०० रुपये तर रुपयांचे पारितोषिक आहे. आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७०० रुपये तर तृतीय विजेत्यास ५०० रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गुरुवार, २३ रोजी रात्री आठ वाजता उद्घाटन समारंभ, रात्री नऊ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. लहान गट व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. मोठ्या गटातील प्रथम क्रमांक सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये तर तृतीय विजेत्यास तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. लहान गटासाठी प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये तर तृतीय दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. संपर्क- मनोज वैद्य ९५४५४५७९२४.