आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीवासीयांना 23 कोटी 20 लाखाची दिवाळी बंपर भेट

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 01, 2022 16:22 PM
views 223  views

कणकवली : कणकवली शहराच्या अनेक विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मागील सरकारच्या काळात हेतू पुरस्करपणे कणकवली नगरपंचायत ला विकास कामांचे निधी देणे डावलले जात होते. त्यामुळे आता असलेल्या युती सरकारच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा व अनेक समस्या मार्गी लागाव्यात या अनुषंगाने ही भेट घेत चर्चा करण्यात आली, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.


कणकवलीत नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, किशोर राणे, महेश सावंत हर्णे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील रस्त्याकरिता सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तर नागरी सुविधा योजनेअंतर्गत अजून स्वतंत्रपणे पाच कोटींचा निधी द्या अशी मागणी देखील आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यावेळी करण्यात आली. कणकवली नगरपंचायत चा मंजूर असलेला स्टाफ पॅटर्न बाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. मंजूर दहा पैकी जवळ दोनच पदे सध्या नगरपंचायत मध्ये कार्यरत आहेत. आठ पदे रिक्त असल्यामुळे त्याचा कणकवली नगरपंचायत च्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या आदेश प्रशासनाला दिले. तसेच स्टाफ पॅटर्न बाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करा व तातडीने प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी द्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांची देखील भेट घेत चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटन विकास दृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील 27/ 28 क्रमांक चे आरक्षण विकसित करण्यात करिता अजून 10 कोटी रुपयांची निधीची आवश्यकता आहे. टप्पा 1 विकसित केले असले तरी अजून दोन टप्प्यांमधील काम बाकी आहे. याकरिता 10 कोटींचा निधी द्या. अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कणकवली गणपती साणा येथे धबधब्याचा मंजूर करण्यात आलेला प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्यात आले. या कामाकरिता अडीच कोटी रुपयांचा निधी व 27/ 28 आरक्षण मधील गार्डनच्या कामाकरता 80 लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तातडीने मंजुरी द्या अशी चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. तसा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांमार्फत या निधीला चार नोव्हेंबर च्या बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याचे श्री हर्णे म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकूण 23 कोटी 20 लाखाची दिवाळी बंपर भेट कणकवली वासियांना या बैठकीतून मिळाल्याची माहिती श्री हर्णे व नलावडे यांनी दिली. लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील असे देखील श्री नलावडे, व हर्णे यांनी सांगितले.