
कणकवली : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आनंदाने व उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा केला. कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी आजोबा दिविजा वृद्धाश्रमात आपल्याने तयर झालेला नवीन बहिण भावा सोबत रंगपंचमीचा सन साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये व त्यांचे कर्मचारी यांनी केले होते.
कौटुंबिक प्रवाहातून आजी आजोबा बाहेर पडल्यामुळे व शारीरिक थकल्यामुळे मनातून थोडे नाराज असतात अशा या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम दिविजा वृद्धाश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये करत आहे. सण उत्सव साजरा करण्या मागचा उद्देश हाच असतो कि आजी आजोबांच्या जीवनात उत्साह व चैतन्य निर्माण व्हावे व जगण्याची नवीन उम्मेद तयार व्हावी या उद्देशाने दिविजा वृद्धाश्रमात प्रत्येक सणवार साजरा केला जातो.
आजी आजोबा व कर्मचारी एकमेकांवर रंगांची उधळण करून नाच गाण्याच्या तालावर नाचत गात रंगपंचमीचा सन साजरा केला .आश्रमातील कर्मचारी समीर मिठबावकर व अश्विनी पटकारे यांनी आजी आजोबांना होळीची टी-शर्ट घालून पुन्हा तारुण्य अवस्थेत आणले होते तर कु सायली तांबे, सौ अस्मि राणे,सौ अमृता इंदाप,ऋतुजा इंदप यांनी आजी आजोबांना सोबत नाचून त्यांच्यात नव चैतन्य निर्माण केले. कर्मचारी सखाराम कोकरे ,सौ सायली इंदप,श्रीम भारती गुरव,सौ सारिका सावंत,सौ सानिया इंदप यांनी आजी आजोबांना हसवण्याचा व आधार देत नाचवले. आजी आजोबांच्या आनंदाने व रंगांच्या रंगतीने आश्रम परिसर रंगमय होवून निघाला. तर कार्यक्रमात अल्पोपहार व भोजनाची सोय आश्रमातील सौ अनुजा आचरेकर, सौ मंजिरी राणे, सौ प्रतीक्षा सावंत यांनी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमातील कर्मचारी अस्मि राणे यांनी केला व कार्यक्रमाची सांगता अश्विनी पटकारे हिने केली.