दिविजा वृद्धाश्रमात कै. मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 25, 2023 13:28 PM
views 90  views

देवगड : अँड.राजेंद्र रावराणे यांच्या मातोश्री कै.मायादेवी विश्राम रावराणे यांच्या 21व्या स्मृतिदिना निमित्त मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रम असलदे, ता- देवगड येथे कै.मायादेवी विश्राम रावराणे यांना आदरांजली वाहून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कै.मायादेवी विश्राम रावराणे यांचा २१ वा स्मृतीदिन दिनांक २३/०७/२०२३ रोजी मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रम असलदे, ता- देवगड येथे संपन्न झाला.ज्येष्ठ विधीज्ञ अँड. अजित भणगे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.


मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रमाला धन धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच ५५ निवासी वृद्धांना मायादेवी ट्रस्टतर्फे नवीन कपडे व भेट वस्तू वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड. राजेंद्र विश्राम रावराणे, त्यांचे कुटुंबीय व आप्त मित्र, निवृत्त गटशिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, डॉ.प्रदीप साटम, डॉ.विक्रांत रावराणे आणि रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे रोटेरियन अध्यक्ष श्री.शंकर परब, सेक्रेटरी श्री.जगदीश राणे, डॉ.विद्याधर तायशेटे, श्री.दादा कुडतरकर, उमा परब, श्री.राजस परब, मेघा गांगण, श्री.राजेश कदम, अँड. दीपक अंधारी, श्री.अनिल करपे, अंकिता करपे, श्री.रमेश मालवीय, सौ. सोनू मालवीय, श्री.प्रमोद लिमये उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाच्यावेळी रोटेरियन प्रमोद लिमये यांनी या कार्यक्रमात नेत्रदान व देहदान याबद्दल संपूर्ण माहिती दिली व त्याचे महत्त्व दधिची ऋषींचे पौराणिक उतारे देऊन सर्वांना समजावून सांगितले. देहदान व नेत्रदान या कार्यासाठी पूर्ण कराव्या लागणाऱ्या कायदेशीर बाबींबद्दलही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले व इच्छुक वृद्धांना फॉर्म दिले. स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.