जिल्हा नियोजनची सभा ३ फेब्रुवारीला

Edited by:
Published on: January 30, 2025 16:31 PM
views 243  views

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वच कामांचा धडाका लावला आहे. यातीलच ते पालक मंत्री म्हणून झाल्यानंतर पहिली जिल्हा नियोजन समिती सभा 3 फेब्रुवारी रोजी होत असून यासोबत  जिल्हा नियोजन अंतर्गत 400 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा शासनास दाखल केला जाणार आहे.

नवनिर्वाचित पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली  नियोजन समिती सभा सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न होणार आहे. या सभेस खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. पालक मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टीने आवश्यक सर्वच कामांचा धडाका. लावला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. आपल्या स्वप्नातला सिंधुदुर्ग बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली पावले उचलली असून, त्या दृष्टीने नियोजन सुरू केल आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी निधी प्राप्त होतो. यासाठी ३ फेब्रुवारी जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्याचे निश्चित केले असून, या सभेमध्ये जिल्हा विकास अंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा शासनासमोर ठेवला जाणार आहे.