सोनुर्लीच्या बंद BSNL टाॅवरबाबत जिल्हा प्रबंधकांना विचारला जाब

Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 11:43 AM
views 188  views

सावंतवाडी : सोनुर्ली गावासाठी उभारण्यात आलेला बीएसएनएलचा टॉवर वारंवार बंद असल्याने उबाठा शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक जिन्नू यांना कार्यालयात जात जाब विचारला. हा टाॅवर बंद करा. अन्यथा, सुरळीत चालु करा अशी मागणी केली. यावेळी तात्काळ टाॅवरला भेट देऊन तो कार्यान्वित करण्याचे आश्वासन श्री. जिन्नू यांनी दिले. सोनुर्ली गावात बीएसएनएलचा टाॅवर असून नसल्यासारखा आहे. या ठिकाणी बॅटरी बॅकअप नसल्याने हा टॉवर जास्त करून बंदच असतो. टॉवर 

कडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थातून नाराची व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करुनही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर उबाठा सेनेचे जिल्हा संघटक शब्बीर मणीयार, शहर प्रमुख शैलेश गंवडळकर,सोनुर्ली उपविभाग प्रमुख विनोद ठाकुर, शाखा प्रमुख नरेश मोर्ये ,संकेत गावकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सोनुर्ली उपविभाग प्रमुख श्री. ठाकुर यांनी श्री. जिन्नु यांचे लक्ष वेधतांना सोनुर्ली गावासाठी पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र या टाॅवरची सेवा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या टॉवरसाठी आवश्यक असलेली बॅटरी बॅकअप केव्हाची चोरीला गेली असून टॉवरसाठी आलेली इलेक्ट्रिक केबल अंडरग्राउंड नसल्याने ती वारंवार कट होऊन या टॉवर बंद पडतो असे सांगितले. यावर आपण तात्काळ लक्ष घालून टाॅवर सुरळीत करण्यासाठी पाऊल उचलतो असे आश्वासन श्री. जिन्नु यांनी दिले.