
दोडामार्ग : श्रीदेवी कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुली भजन स्पर्धा येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी रात्री श्री खंडेराय भवानी मंदिर कोनाळ येथे होणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी संघ
या स्पर्धेसाठी माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्याकडून सहभागी संघांना मानधन, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्योजक विशाल परब यांनीही स्पर्धेला सहकार्य केले आहे.
एकूण ७ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. रात्री ८ वाजता श्री माऊली भजन मंडळ कोलझर, श्री विठ्ठल रुक्माई भजन मंडळ बोडदे आणि श्रीदेवी सातेरी राष्ट्रोळी भजन मंडळ कसई दोडामार्ग यांचे सादरीकरण होईल.
रविवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ तेंडोली, श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरुर, सद्गुरु प्रसादीक भजन मंडळ अणसुर, श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त, स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी आणि स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी हे संघ आपली कला सादर करतील.
पारितोषिके आणि प्रायोजक:
स्पर्धेचा निकाल मध्यरात्री जाहीर होऊन लगेच बक्षीस वितरण केले जाईल.
प्रथम पारितोषिक: १० हजार रुपये (कै. सुलोचना तुकाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सौ. सुचिता सुरेश दळवी यांच्याकडून पुरस्कृत). दुसरे पारितोषिक: ७ हजार रुपये (कै. शिवराम नाना देसाई केर यांच्या स्मरणार्थ फ. रा. प्रतिष्ठानकडून पुरस्कृत).
तृतीय पारितोषिक: ५ हजार रुपये (कै. जिवाजी लोंढे यांच्या स्मरणार्थ प्रेमानंद उर्फ बबन लोंढे यांच्याकडून पुरस्कृत). उत्तेजनार्थ पारितोषिक: २ हजार रुपये (कै. गणपत लोंढे यांच्या स्मरणार्थ कृष्णा लोंढे आणि परिवार यांच्याकडून पुरस्कृत).सर्व चषके कै. दत्ताराम लोंढे यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ उर्फ उमेश सावंत (माजगाव) यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली आहेत.
वैयक्तिक पारितोषिके (सन्मानचिन्ह):
रामराव लोंढे (हार्मोनियम) चिंतामणी लोंढे (पखवाज),काशीराम निंबाळकर (गायक),
अजय सावंत (तबला),प्रज्ञेश लोंढे (कोरस),
महेश लोंढे( झांज) अशी ठेवली आहेत.
स्पर्धेचे ठिकाण आणि व्यवस्थापन:
ही भजन स्पर्धा श्री देवी खंडेराय भवानी मंदिर, कोनाळ येथे होणार आहे. स्पर्धेचे व्यवस्थापन श्री देवी भवानी डेकोरेटर्स भालचंद्र लोंढे आणि कोनाळ ग्रामस्थ यांच्यासोबतच विश्वनाथ सावंत, हनुमंत गवस आणि कु. मंथन सावंत हे करणार आहेत.