लोरेत रंगणार जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 17, 2024 05:39 AM
views 267  views

वैभववाडी : लोरे नं२ येथील श्री दत्त सेवा ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मांजलकरवाडी येथील मैदानात ही स्पर्धा  होणार आहे. जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

   प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लोरे 2 येथील मांजलकरवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५वा स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. जिल्ह्यातील निमंत्रित कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक७००१ व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक ५००१ व चषक, शिस्तबद्ध संघ, उत्कृष्ट चढाई व पकड यांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुक्यातील  क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तसेवा ग्रामस्थ मंडळ लोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.