
सावंतवाडी : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब मित्रमंडळ, सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो-कराटे - आकिदो असोसिएशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धा सावंतवाडीत आयोजित करण्यात आली आहे.
रविवार २७ नोव्हेंबर २०२२ रोजी स. १० वा कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. तर सच्चिदानंद उर्फ संजू परब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी राजपुरोहित, डॉ. राजेशकुमार गुप्ता (संस्थेचे अध्यक्ष, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आर.पी.डी. हायस्कूल मैदान, सावंतवाडी इथं ह्या स्पर्धा होणार असून संस्थेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक वसंत जाधव व संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.