
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गचा स्थापना दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे जयंतीनिमित्त संस्थेने जिल्हास्तरीय खुली निबंध, कविता, वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. तिन्ही स्पर्धा शालेय, युवा व खुल्या गटात घेतली जाणार असून विजेत्यांना रोख बक्षीसे, आकर्षक चषक व गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे.
स्पर्धेचे विषय, नियम अटी याबाबतची माहिती घेण्यासाठी स्पर्धाप्रमुख यांचेशी संपर्क साधावयाचा आहे. स्पर्धेचे प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत, निबंध स्पर्धा- चंद्रसेन पाताडे (८८०६६१६७७५),कविता स्पर्धा-मंगेश आरेकर (९४०४९४४४८५),वक्तृत्व स्पर्धा- प्रशांत चव्हाण (९४२०२६२१६८), हस्ताक्षर स्पर्धा, बाळकृष्ण नांदोसकर (९४०३३५२१८०) या स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत १० मार्च २०२५ पर्यंत असून स्पर्धेतील यशस्वीतांना संस्थेच्या १६ मार्च २०२५ रोजीच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सर्व इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव तसेच समस्त जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.