
वेंगुर्ला : श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून, विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली सुरंगपाणी आणि स्वरसंगीत प्रसादिक भजन मंडळ हरिचरणगिरी- कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ८ व रविवार दिनांक ९ मार्च रोजी रोजी सायंकाळी ७ वाजता ही स्पर्धा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान, सुरंगपाणी या ठिकाणी होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख ५ हजार रु. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख ४ हजार रु. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख ३ हजार रु. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन मंडळांना प्रत्येकी १ हजार रु. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट संवादिनी, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट कोरस यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण १० मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या स्पर्धेचा सर्व भजन प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वरसंगित प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी- कोंडुरा व श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुषार पेडणेकर (९०८२२६९७०२) व श्रीकृष्ण धुरी (८३२९०४६२६९) यांच्याशी संपर्क साधावा.