जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार

पालक मंत्र्यांचे आदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 26, 2024 12:52 PM
views 339  views

सिंधुदुर्गनगरी  :   सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय सावंतवाडी किंवा कुडाळ येथे स्थलातर करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही मेडीकल कॉलेजशीच जिल्हा रुग्णालय संलग्न असते त्यामुळे स्थलांतर करण्याचा प्रश्नच येत नाही असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले मेडीकल कॉलेजकरिता नव्या इमारती बांधण्यात येत असल्याने जिल्हा रुग्णालयच्या जुन्या इमारती पाडव्या लागत आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी 30 रोजी बैठक घेऊन जिल्हा रुग्णालयाला तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले 

     जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथुन स्थलातर होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालय बचावं समितीची बैठक बुधवारी ओरोस रवळनाथ मंदिर येथे पार पडली व मुख्यालय विकास संघर्ष समिती स्थापन केली व या समितीच्या शिष्टमंडळाने जनता दरबारच्या निमित्ताने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व चर्चा केली यावेळी मुख्यालय विकास संघर्ष समितीचे समन्वयक महेश उर्फ छोटू पारकर , आनंद उर्फ भाई सावंत,उदयकुमार जाभवडेकर , पांडुरंग मालणकर, अमित भोगले , हार्दिक शिगले,सत्यवान चव्हाण,गोपाळ हरमलकर, शुभम परब,रावजी यादव , प्रकाश जैतापकर, सुनील जाधव,सुशील निबरे, प्रशांत राणे आदी सह सिंधुदुर्गनगरीं पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते 

      सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा मुख्यालय झाल्यापासून जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथेच आहे ,संपूर्ण जिल्ह्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण असून लोकांना ते सोईचे ठरते मेडीकल कॉलेज झाले तरी जिल्हा रुग्णालय मुख्यालयाच्या ठिकाणीच असायला हवे त्यामुळे कोणत्याही परिस्थिततीत जिल्हा रुग्णालय स्थलांतर करू नये आणि स्थलातर झाल्यास आंदोलन उभारले जाईल असे सांगितले तसेच जिल्हा केंद्र असल्याने जिल्हास्तरीत सर्व कार्यालये इथेच राहायला हवी सर्व सुविधा असायला हव्यात अशी मागणी पालकमंत्र्यां समोर माडण्यात आली

     यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निवेदनाची दखल घेत जिल्हा रुग्णालय कुठेही स्थलांतरीत करण्यात येणार नाही असे स्पष्ट केले जिथे मेडिकल कॉलेज असते तिथेच संलग्न जिल्हा रुग्णालंय असते त्यामुळे जिल्हा रुग्णालंय स्थलांतर करण्याचा प्रश्नच येत नाही सद्या मेडीकल कॉलेजच्या नव्या इमारती काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची जुनि इमारत पडण्याचे काम सुरु केले जाणार आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या काही इमारती खाली करण्याची नोटीस मेडीकल कॉलेज कडून काढण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले जागेठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी 30 सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक, व मुख्यालय विकास समिती सोबत बैठक घेऊन तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते