जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन टीम, रेक्स्यू टीमला सर्व साहित्य मोफत पुरवणार : विशाल परब

Edited by: भरत केसरकर
Published on: July 21, 2023 19:19 PM
views 183  views

वेंगुर्ला : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.यात मोठ्या प्रमाणात पाणी घुसून हाहाकार माजला आहे.काही ठिकाणी वित्तहानी झाली आहे.तर काही ठिकाणी पाण्यातून जाण्याचे धाडस केले जाते. परिणामी पुराच्या पाण्यातून वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. यावेळी अनेक तरूण धाडस करून पुरातून वाहून जाणाऱ्यांना जीव धोक्यात घालून वाचवतात.

या सर्व आपत्ती व्यवस्थापन टीम व रेक्स्यू टीमला लागणारे सर्व साहित्य मोफत देण्याची घोषणा भाजप युवा नेते तथा विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक विशाल परब यांनी केली आहे.

जिल्ह्यातील जेवढ्या टीम असतील तेवढ्या टीमने विशाल सेवा फाऊंडेशन चे साई भोई-9049694459 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक विशाल परब यांनी केले आहे. मातोंड काजीरमळा  येथे ते काल पुरात बुडणारांना आपत्कालीन काळात मदत केलेल्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.