
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षासाठीचा १ लाख ३ हजार ९०० रुपये शिलकीचा १६ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांचे अर्थंसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर. तर सन २०२३/२४ या आर्थिक वर्षाचे १९ कोटी २६ लाख रुपयांचे सुधारित अंदाज पत्रक जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण या सह विविध विकास कामांसाठी या अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व लोकांपर्यंत जिल्हा परिषद प्रत्यक्ष पोहोचेल आणि ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात आदर्शवत बनेल असे काम केले जाईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे सन २०२४/२५ चे अंतरिम सुधारित आणि सन २०२५/२६ या आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर झाले.या वेळी जी प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस,मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांसह सर्व मुख्य अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.