
सावंतवाडी : दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महिला सेल शाखा, सावंतवाडी यांच्यामार्फत ईशप्रेमालय कॅन्सर सुश्रुषा केंद्र कोलगाव, ता. सावंतवाडी येथे सर्व रुग्णांना पौष्टीक अन्न, काजू, बदाम, बेदाणे, पौष्टीक लाडू, खारीक, खजूर, मूग, मटकी, अन्न धान्ये यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म. ल. देसाई यांच्यासह सर्व महिला सेलच्या प्रमुख महिला, श्रावणी सावंत, सीमा पंडित, स्नेहा लंगवे, तेजस्विता वेंगुर्लेकर, मनाली कोरगावकर, श्वेता सावंत, रेखा कुंभार, रोशनी राऊत, ऐश्वर्या सावंत, श्रेया परब, साक्षी शेडगे, कोंडये मॅडम, रामा गावडे, नरेंद्र सावंत, संजय शेडगे, अमोल पाटील, रोशन राऊत, दीपक पंडित, श्री. सावंत आदि उपस्थित होते