आरपीडीतील गरजू - गरीब मुलींना गणवेश वाटप...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 25, 2023 11:45 AM
views 99  views

सावंतवाडी : आरपीडी हायस्कूलच्या सन १९९३-९४ चे माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक गावडे, त्यांचे शालेय जीवनातील सहकारी सुनिल नाईक, संजय सावंत, सुरेश गवस यांच्यावतीने आरपीडी हायस्कूल च्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप करण्यात आले.

आरपीडी हायस्कुल च्या सन १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पद्मराज मुणगेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी श्री किरण पालव, श्री संदिप सामंत, श्री नारायण घाटकर, शाळेचे प्राचार्य जगदीश धोंड पर्यवेक्षक अरविंद साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री धोंड यांनी गणवेश वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले.