सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

अॅड. सायली दुभाषी यांचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 13:56 PM
views 166  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिला शहर अध्यक्ष अॅडवोकेट सायली दुभाषी यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे कळसुलकर इंग्लिश स्कूल  सावंतवाडी मध्ये घेण्यात आला . यावेळी  होतकरू व  गरजू विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला शहर अध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान ,तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख ,महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई ,राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष सौ आगा-शेख, सौ मारिता फर्नांडिस ,जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख ,शहरचिटणीस राकेश नेवगी, युवक पदाधिकारी अर्षद बेग, तौसीफ आगा रुकसाना खान ,संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै ,सचिव डॉक्टर नार्वेकर, शाळेचे मुख्याध्यापक मानकर सर , सावंत सर, संस्थेचे लिपिक केंकरे सर आधी शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.