पडेल हायस्कूल इथं विध्यार्थ्यांना वह्या वाटप..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 25, 2023 16:02 PM
views 159  views

देवगड : ग्रामपंचायत पडेल यांच्या आयोजनातून पडेल गावातील सर्व प्राथमिक शाळेतील 1 ली ते 4 थी चे विद्यार्थी व श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडेल चे 5 वी ते 10 वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यासाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. विजय घरत यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी विजय घरत, सरपंच भुषण पोकळे, प्रशालेचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, पाटिल, पाळेकर मॅडम, घाडीगांवकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रा. पं. सदस्य प्रभाकर वाडेकर, सिद्धेश पाटणकर, सायली वारीक, अदिती तानवडे, रोजगार सेवक विनायक चव्हाण, तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रविराम माळगवे सर यांनी केले व संजीवनी फडके यांनी आभार मानले.