२००हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या - शालेय वस्तूंचं वाटप ; संताजी रावराणेंचा पुढाकार

नितेश राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 24, 2023 20:20 PM
views 136  views

वैभववाडी : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाभवे - वैभववाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळांना माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्यातर्फे वह्या व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. २००हून अधिक विद्यार्थ्यांना याच वाटप करण्यात आले. 

   आ.नितेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला.माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी यानिमित्त गुणवंत सत्कार केला.तसेच नगरपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळांना शालेय साहित्य वाटप केले.शहरातील दत्त विद्या मंदिर शाळा नं. १ व वि. मं. वाभवे प्रशाला मधील सर्व मुलांना वह्या, शालेय 'वस्तू चे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा. प्राची तावडे, महिला बालकल्याण सभापती नगरपंचयात  यामिनी वळवी, नगरसेवक सुभाष रावराणे, माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे, प्रशालेच्या मुखाद्यापिका शाळेचे  दिप्ती पाटिल, आशिष रावराणे, शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.