
सिंधुदुर्गनगरी : दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रानबांबुळी बौद्धवाडी येथील जय भीम युवा मित्र मंडळाच्या वतीने 'एक वही, एक पेन' हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमास जनते कडून चांगला प्रतिसाद लाभला व जनते ने मंडळाकडे "एक वही, एक पेन" या उपक्रमास वह्या व पेन/पेन्सिल आणून दिल्या त्याबद्दल सर्वप्रथम जय भीम युवा मित्र मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार. त्या वह्या व पेन, पेन्सिल विद्यार्थ्यांच्या उपयोगी याव्यात या साठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. दिनांक १४ ऑगस्ट २०२४ व दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. १४ ऑगस्ट २०२४ रोजी रानबांबुळी सिमरेवाडी जिल्हा परिषद शाळा मध्ये वह्या, पेन आणि पेन्सिल वाटप करण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ रोजी रानबांबुळी जिल्हा परिषद शाळा येते वह्या, पेन आणि पेन्सिल वाटप करण्यात आले. रानबांबुळी जिल्हा परिषद शाळे मध्ये रानबांबुळी ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय. शुभास बांबुळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल देऊन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस जय भीम युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम, सदस्य कल्पेश कदम, शाळेचे शिक्षक मंडळी, पालक व इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.